आरोग्य - लेखांक - 4
’आरोग्य’ संदर्भातील लेखमालेत आपले पुनःष्च स्वागत ! मी जीवनावर भरभरुन प्रेम करणारा आहे . ”या जन्मावर या जगण्यावर षतदा प्रेम करावे“ मंगेष पाडगांवकरांच्या या कवितेतील मर्म मला उमगलेले आहे . मला अनेक विशयांत रुची आहे . कुतूहल आहे . त्यातही अध्यात्माकडे माझा विषेश ओढा आहे . जीवनाचा आस्वाद रसिकतेने घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्या कौटुंबिक, सामाजिक भूमिका यथाषक्ती पार पाडाव्यात या विचारांचा मी आहे . मी देखील तुमच्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखासारखा कुटुंबवत्सल आहे . माझं कुटुंब माझा परिवार विस्तारलेला आहे . ’विको’ परिवाराषी संलग्न प्रत्येक सदस्य माझा आहे .
नीटनेटका प्रसन्न चेहरा व्यक्तिमत्वास उठाव देतो . दिवसेंदिवस प्रेझेंटेबल राहणे ही लोकांची मानसिक गरज आहे . या सर्वांच्या प्राप्तीसाठी आपल्या दिनचर्येकडे लक्ष द्यावयास हवे . पुरेषी झोप, व्यायाम आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा . तसं पाहायला गेलं तर वैयक्तिक जीवनातील मानसिक ताणतणाव व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम करतात . ताणतणाव हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असला तरी त्यापासून मुक्त राहण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायलाच हवा . स्चच्छ मन आणि सकारात्मक विचार तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर सुपरिणाम घडवून आणतात .
’ सहा ऋतुंचे सहा सोहळे’ आपण अनुभवतो . त्यात उन्हाळा
म्हटलं की आपली त्वचा आणि मन उश्णतेने करपायला लागते . आत्ताच प्रखर ऊन षरीराला भाजून
काढत आहे . त्वचा हे संपूर्ण षरीराचे बाहय आवरण असल्याने सगळे आघात प्रथम तिच्यावर
होतात . त्यामुळे नकोनकोसे वाटणारे त्वचेचे विकार आपले मनःस्वास्थ्य साफ बिघडवून टाकतात
. चेह-यावरील एखादा स्पाॅट, पुटकुळी आली आणि मुक्कम वाढला की कोणत्याही वयोगटातील व्यक्ती
अगदी हतबल होते . त्यात आपल्या आजूबाजूचे बिन डिग्रीचे डाॅक्टर आणि मोफत सल्ला देणा-यांची
आपल्याला कमतरता नसते . ब-याचदा आजार परवडतो पण आगंतुक सल्ले नकोत असेही वाटून जाते
. या लोकांना आपल्या चेह-याची फार काळजी असते . त्यांचा आत्मविष्वास वाखाणण्यासारखा
असतो . मला तर असा सल्ला देणारे भेटले की तुकोबांचा अभंग आठवतो -
”तुका म्हणे ऐषी कळवळयाची जाती।
करी लाभावीण प्रीती।।“
असे ’लाभावीण प्रीती’ वाले पावलोपावली भेटतात आणि आपली
गोची करुन ठेवतात . गोरा रंग आणि नितळ निरोगी त्वचा या दोन्ही भिन्न गोश्टी आहेत .
यात तफावत आढळते . आपल्या देषात जेवढं गो-या रंगाला अवास्तव महत्व दिलं जातं तेवढं
महत्व जगात अन्यत्र कुठेही नाही . त्यामुळे गो-या रंगाच्या मागे लागू नका . त्वचा गोरी
नसली तरी निरोगी, सतेज असायला हवी . आपल्याला देवाने जे दिलंय त्याविशयी कोणताही न्यूनगंड
बाळगू नये . खरंतर बाहय त्वचेच्या रंगापेक्षा
स्वभावगुण फार महत्वपूर्ण ठरतात . अनुवंषिकतेने आपल्याला षरीर संपदा प्राप्त होते .
आहे त्यात समाधान मानले तर तुमचा वेळ, श्रम, पैसा वाया जाणार नाही . हे सर्व आपण आपल्या
व्यक्तिमत्व विकासासाठी वापरु षकता .
प्रत्येकाने आपल्या आयुश्याचे श्रेयस आणि प्रेयस निष्चित
केले पाहिजे . समाजासाठी आयुश्य वेचणा-या व्यक्ती चेहरा वा षरीरानेच सुंदर होत्या असे
नाही तर त्यांचे विषाल मन आणि कर्तृत्व अतिषय देखणे होते . ’काय भुललासी वरलिया रंगा’
असे संतवचन आहे . त्यामुळे कोणत्याही वयात छान दिसण्याचा अतिरेकी अट्टाहास करु नये
. जे आहे जसे आहे तसे स्विकारावे आणि पुढे मार्गस्थ व्हावे हेच उत्तम ! तरीदेखील आयुर्वेदाने
मानवाला नेहमीच मोलाची साथ दिली आहे . सुंदर दिसावं या आषेतून विविध क्रिम, पावडर चेह-यास
चोपडल्या जातात . विको उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक घटकांना अनन्य साधारण महत्व आहे .
त्यामुळे सौंदर्य विषेशतः चेह-याच्या सौंदर्यासाठी विचार केला गेला तेव्हा कालसुसंगत
’फेसवाॅष’ चा जन्म झाला . हल्ली फेसवाॅष हा महत्वाचा भाग आहे .
सततचा प्रवास, धूळ, प्रखर सूर्यप्रकाष यामुळे प्रफुल्लित
चेहरा काही तासात तेलकट, निस्तेज वाटू लागतो तो स्वच्छ करण्याची घराबाहेरची गरज म्हणून
फेसवाॅष उपयुक्त आहे . नव्या पिढीची आणि बदलत्या काळाची ही गरज आहे . अनेक रिसर्च करुन
विकोने फोमबेस फेसवाॅष जनसामान्यांसाठी आणला आहे . प्रत्येक व्यक्तीची त्वचा अमूल्य
आहे . आयुर्वेदाने तुमच्या आरोग्याची काळजी नेहमीच वाहिली आहे . ’हळद’ही सर्वगुणसंपन्न
आहे . विकोच्या फोमबेस फेसवाॅष मध्ये प्रामुख्याने हळदीचा वापर केला गेला . ’हळद’ ही
जंतुघ्न असल्याने तिचे फायदे अनेक आहेत . आहारातून ’हळद’ पोटात जाते पण बाहय त्वचेचे
पोशण देखील हळदीमुळे होऊ षकते .
फेसवाॅष तयार करताना विको परिवाराने सर्वसाकल्याने विचार
केला आहे . असं म्हणतात, ’जगात सर्व सोंगं करता येतात पण पैषाचं सोंग करता येत नाही’
. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिषाला कात्री लावायची नाही, कमीत कमी खर्चात जास्तीत
जास्त ग्राहकाला देऊ करायचं हाच विचार या उत्पादनामागे होता . या फेसवाॅषची छोटी टयूब
सकाळी एकदा आणि रात्री झोपताना वापरली तरी एक महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकते अषी ग्राहकांची
प्रतिक्रिया आहे . त्यामुळे मनी सेव्हर फेसवाॅष
असे म्हटल्यास वावगे ठरु नये . चेह-यावर पाणी मारुन मटार दाण्या एवढया आकाराचे हे फेसवाॅष
चेह-यावर हलक्या हाताने मसाज करावे . पंधरा सेकंदानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून
टाकावा . प्रवासात सोबत नेण्यास सुटसुटीत असा फेसवाॅष पर्समध्ये कसाही ठेवला तरी घट्ट
झाकणामुळे पाझरत नाही, इतर वस्तू खराब होत नाहीत ही काळजी घेतली आहे . याचे पॅकेजिंग
आकर्शक आहे . ग्राहकाला येणा-या समस्या आधीच विचारात घेऊन त्याची साईझ आणि डिझाईन केलेले
आहे . ग्राहकाच्या श्रमाच्या पैषाचा पुरेपूर वापर/मोबदला त्याला मिळायला हवा हेच आमचे
ध्येय आहे .
विको फोमबेस फेसवाॅष हा सर्व प्रकारच्या त्वचेला उपयुक्त
आहे . त्यातही ज्यांची त्वचा (आॅईली) तेलकट असते त्यांना जास्त फायदा होतो . इतर ऋतूंपेक्षा
उन्हाळयात आॅईली स्कीन समस्या निर्माण करते . अषावेळेस मधासारखा दिसणारा सुवासिक फेसवाॅष
चेह-याला लावल्यावर चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि मेंदूला ताजेतवाने वाटते . फेसवाॅषच्या
गुणधर्मामुळे चेह-यावरील जंतूंचा नाष होतो आणि त्वचेला संरक्षक कवच प्राप्त होते .
याच्या नियमित वापराने मुरमं, पुटकुळया, काळपट डाग,
जखमा ब-या होण्यास मदत होते . हे एक प्रकारचे
आयुर्वेदिक मेडिसीन आहे . तुमच्या नाजूक सुंदर त्वचेला हे एक प्रकारचे वरदानच आहे .
कोणत्याही गोश्टीची आधी प्रचिती घ्यावी त्यानंतर आपले मत बनवावे . जगात सर्वात मौल्यवान
काय तर ते आपले षरीर आणि त्यावरील त्वचा . याची निगराणी ठेवण्यासाठी आपला ’चाॅईस’ ही
तसाच हवा . चोखंदळ ग्राहक हे नेहमी नैसर्गिक तत्वांवर भर देतात आणि म्हणूनच निसर्गही
त्यांना भरभरुन देत असतो .
. . .क्रमष:



