उद्योजकता विकास ऑनलाइन कोर्सचा प्रतिसाद

प्रिय श्री. संजिव पेंढारकर साहेब,


मागिल वर्षी २०२० ला कोविडने जगभर घातलेल्या थैमानाने

विदेशातून नोकरी गमावल्यावर आणि तेथेच बेकार अवस्थेत

सहकुटुंब १० महिने लॉकडाऊन भोगल्यावर मी परीवारासह

भारतात परत आलो.


पण दुर्देव कुठे पाठ सोडायला तयार होते ? काळपुरुष‍ वर वर

गालातल्या गालात पण मनातुन खदखदुन हसत होता.

माझ्या दुर्देवाचे दशावतार बघायला आणि दुर्देवानेही त्याचे

फुलटु मनोरंजन करायला बाह्या सरसावल्या. 


आणि १० महिने दुबईत ठणठणीत असलेला मी. दुबई आणि

मुंबई एअरपोर्टवर कोरोना निगेटिव्ह असलेला मी

होटेल क्वारंटाईन मध्ये ५ व्या दिवशी आश्चर्यकारकरित्या

लक्षणे नसलेला कोरोना पॉझिटिव्ह आलो. 

आणि माझे जगच बदलले. फोनवर फोन.

तासाच्या आत अँम्बुलन्स. 

मात्र क्वारंटाईन सेंटरमधील महान व्यवस्था.

तेथील आठवडी बाजारासारखा पेशंट्सचा मेळावा. 

अतिपरिचयात अवद्न्या तशी कोरोना भयमुक्त

कोरोना पेशंट्सचा निष्काळजीपणा,

हत्तीवरुन साखर वाटावी तसे औषधांचे वाटप करणारे

वार्डबॉय कम डॉक्टर. आणि डॉक्टर कम जेलर. 

पुर्वी कुष्ठरोग्यांची कशी मानसिकता होत असेल

त्याची कल्पना देणारे नातेवाईकांचे आणि सोसायटीची वागणुक.


पहिल्यांदाच मला भीती वाटली कि इथे राहुन मला नक्किच कोरोना होईल.

सगळीकडे निराशेचे मळभ दाटून आले.


म्हणुन मी स्वतःला खोलीत कोंडुन  घेतले आणि वेळ कसा कारणी लावावा

ह्याचा विचार करतांना माझ्या बघण्यात तुमच्या दोन्ही कोर्सची माहिती आली.

तुमच्याशी बोलतांना मराठी तरुणांना व्यक्तिंना उद्योग व्यवसाय उभे करण्यास

उद्युक्त  करण्याची तुमची प्रामाणिक तळमळ जाणवली.

आणि मी तुमचे दोन्ही कोर्स जॉईन केले.


आणि काय आश्चर्य़ गडद काळोखात आशेचा किरण दिसला,

रणरणत्या उन्हात हवेची झुळुक जाणवली. आणि मनावरील

निराशेची जळमटे दुर झाली. उत्सहाची भावना निर्माण झाली.

परागंदा झालेला आत्मविश्वास पुन्हा परतला. 


आणि सांगायला आनंद वाटतो कि मागिल एक वर्षात मी ३ उद्योग सुरु केलेत

आणि ४ था लवकरच सुरु करेन आणि सिझनल व्यवसाय करेन ते वेगळेच. 

मी खाचखळग्यातुन अंधारात मार्गक्रमण करायला सुरुवात केली आणि

काय आश्चर्य ! गाडीच्या हेडलाईट सारखे मी जसजसा पुढे जातोय तसा

मार्ग उजळत चाललाय. मनाच्या संकल्पाला ध्रुड बनवणारे

लोकं भेटत चालली आहेत.





ज्या नोकरींसाठी मी चिंतेत असायचो त्या आता स्वतःहुन माझ्या मागे येताहेत.

आणि मी नकार देत चाललोय.

आणि 3 इडियट सारखे म्हणेन कि   हाडे तोडुन घेतल्यानंतर हा आत्मविश्वास आलाय.

आता ठरवलंय आंतरराष्ट्रीय नोकर बनायचे नाही त्या ऐवजी देशी मालक बनायचे.


हा आत्मविश्वास जागवलाय आणि वाढवलाय संजीव साहेब तुमच्या उत्तम कोर्सेसमुळे.

 


शतशः धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻


आपला नम्र


देवेंद्र सदाशिव भागवत,

पुणे.

8956 149 150

8956 581 582


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !