एटीएम सेवेचा लाभ


बॅन्केत पैसे भरणे आणि गरजेच्यावेळी ते काढणे व्यक्तिगतरित्या हे प्रमुख कार्य त्यातही मर्यादा येते ती वेळेची ! शिवाय आपला देश हा सणसमारंभ आणि विपुल सुट्ट्यांचा देश म्हणजेच गरजेच्यावेळी बॅन्क बंद | हा अनुभव जसा ग्राहकांना येऊ लागला, तसं आपल्या ग्राहकांसाठी बॅन्केने नवीन सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिली. एटीएम ही अशी सेवा आहे की जी दिवसाचे २४ तास पैसे मिळवण्याची सोय करते. (All Time Money) याला सर्व काळ रकमेची सोय असेही म्हणतात अगदी सुरुवातीला याला 'ऑटोमॅटिक टेलर मशिन' असेही संबोधले जायचे 

'ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे देणे व त्यांची रक्कम जमा करुन घेणे ही प्रक्रिया करणारे स्वयंचलित यंत्र म्हणजे एटीएम होय ' 

'ग्राहकांशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी बॅन्केने निर्माण केलेली स्वयंचलित यंत्रणा म्हणजे एटीएम होय '. 

एटीएम म्हटल्यावर काचेच्या तावदानातील एक मशीन, अशी संकल्पना कोणाही व्यक्तीच्या डोळयापुढे उभी राहते, इतकी एटीएमची ख्याती पोहचली आहे. एटीएमचा उगम पाश्चात्य देशात झाला याची कहाणी मनोरंजक आहे. इंग्लंडमध्ये बार्कलेज बॅन्कने जून १९६७ मध्ये प्रथमच पैसे देण्याची मशीन प्रस्थपित केली. अगदी सुरुवातीला पैसे काढण्यासाठी पेपर पावती दिली जात होती. पावती मशीनमध्ये घातली की पावतीची नोंद होई आणि दहा नोटा मिळत असत. एका वर्षानंतर हळूहळू फ्रान्स, स्विडन, स्वित्झर्लंडमध्येही अशाच प्रकारच्या मशीन्स् प्रस्थापित करण्यात आल्या 

बॅन्क तंत्रज्ञानातील संशोधनामुळे इंग्लंडमध्ये लॉयडस् बॅन्केने प्रथमत: online cash point machine प्रस्थापित केली. IBM कंपनीने ती विकसीत केली प्लॅस्टिक कार्डमध्ये मॅग्नेटिक स्ट्रीप असल्यामुळे मशीनला ग्राहकाचा खाते क्रमांक ओळखता येत असे. भारतात १९८७ मध्ये HSBC मध्ये प्रथमत: एटीएम प्रस्थापित करण्यात आले 

एटीएम कार्ड मिळणारी व्यक्ती त्या बॅन्केची खातेदार असते खातेदाराला ही सुविधा मिळविण्यासाठी बॅन्केकडे अर्ज करावा लागतो. सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यावर बॅन्क त्या खातेदाराला एटीएम कार्ड देते. 

 

 एटीएम सेवेचा लाभ घेण्यासाठी खातेदाराला बॅन्केकडे विशिष्ट रक्कम शिल्लक ठेवावीच लागते. धनादेश पुस्तिका आणि एटीएम धारकांना इतर ग्राहकांपेक्षा जास्त शुल्क ठेवावे लागते. खातेदार एटीएम कार्डच्याद्वारे कधीही खात्यातून पैसे काढू शकतो. साधारणत: बॅन्केत, एस टी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशनचा परिसर, बाजारपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी एटीएम मशीन बसविले जाते. कोणत्याही वेळेस ग्राहक गरजेनुसार पैसे काढू शकतो. 
रक्कम काढण्यासाठी खातेदार एटीएम कार्ड त्या मशीनमध्ये इन्सर्ट करतो. मशीनमध्ये संगणक सदर ग्राहकाची ओळख पटवतो त्यानंतर ग्राहकाने मागणी केलेली रक्कम संगणकाद्वारे दिली जाते. ग्राहकाला पैसे काढण्यासाठी आता ताटकळत उभे राहण्याची गरज राहत नाही. 
एटीएम कार्ड धारकाच्या कार्डवरती बॅन्केचे नांव, खाते क्रमांक, उपभोक्ता क्रमांक, मुदत, खातेदाराचे नांव, इ माहिती असते. कार्डच्या मागील बाजूस कार्डधारकाची स्वाक्षरी असते तसेच सूचनाही दिलेल्या असतात. 



 

प्रत्येक बॅन्क एटीएम धारकाला एक सांकेतिक क्रमांक पासवर्ड देते हा पासवर्ड ग्राहकाला व बॅन्केलाच माहीत असतो. कार्ड धारकाने आपला पासवर्ड गोपनीय ठेवावयाचा असतो तो युनिक असतो. 
१) शिल्लक पाहणे - एटीएम मशीनद्वारे कार्ड इन्सर्ट केल्यावर बॅलन्स वा शिल्लक असे बटण दाबल्यावर खातेज्मक टाईप केल्यानंतर खात्यातील रक्कम कळते. २) धनादेश खात्यावर भरणे - विशिष्ट प्रकारच्या पाकिटाचा वापर करुन धनादेशाची माहिती देणरी पावती पाकिटात घालून पाकीट मशीनमध्ये इन्सर्ट करुन डिपॉझिटचे बटण दाबले, खातेमक टाईप केला की पाकीट डिपॉझिटच्या खणात सरकवले  सदर धनादेश जमा झाल्याची पावती मिळते. 
३) रोख रक्कम खात्यात भरणे - एटीएम कार्ड मशीनमध्ये इन्सर्ट करुन बॅन्केने पुरविलेल्या विशिष्ट पाकिटात पैसे घालून डिपॉझिटचे बटण दाबले व नंतर खातेमंक टाईप करुन पाकीट डिपॉझिट खणात सरकवले म्हणजे तुमचे कार्ड व पैसे भरणा पावती परत मिळते. 
बॅन्केशी जे व्यवहार आपण करतो तेच एटीएम मशीनद्वारे करु शकतो. आपल्या वेळेनुसार व सोयीनुसार ही सेवा वापरता येते



 

Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !