ग्लासभर दूध पियो तो सेहतमंद जियो

९०च्या दशकातील अमूलची जाहिरात आठवतेय ?

 'पियो ग्लासभर दूधम्हणत अमूलचे ब्रँडिंग करणारी ही जाहिरात

लाखमोलाचा म्हणजेच दूध नक्की प्या असा सल्ला देऊन गेली. 

अनेक जाहिरातींमधून दाखवताना 'दूधसी कोमल त्वचाअसा अनेकदा 

उल्लेख झालेला दिसून येतो अशी दूधासारखी कोमल त्वचा मिळवायला 

दूधाचा वापर करणे गरजेचं आहे !

असे म्हटले जाते की इजिप्तची महाराणी क्लिओपात्रा रोज एका गोपनीय 

द्रव्याने त्वचेला मालिश करायचीहे गोपनीय द्रव्य म्हणजेच दूध होय.

कच्चे दूध चेहऱ्यावर आणि मानेला लावून १० मिनिटे ठेवून चेहरा स्वच्छ 

धुतल्याने कांती उजळण्यास मदत होते. 

दुधात कापूस बुडवून त्या कापसाने चेहरा स्वच्छ केल्याने त्वचा आतून 

बाहेरुन नितळ आणि निर्मल होतेतसेच पपई किंवा लिंबाचा रस दुधात 

टाकून फेसपॅक बनवून लावल्यावरही चेहऱ्याला तजेला येतोतसेच दूध 

एक बहुगुणी मॉइश्चरायझर आहे.














दूध जसे त्वचेसाठी उपयोगी आहे तसेच ते शरीरासाठीही पौष्टिक आहे

दूधाला पूर्णान्न म्हटले आहेयाचे मुख्य कारण म्हणजे एक कप गायीच्या 

दूधातून आपल्याला मोजक्या कॅलरींबरोबर प्रथिनेआवश्यक फॅटस्

कॅल्शियम जीवनसत्वबी१२ जीवनसत्वपोटॅशियमफॉस्फरस आणि 

सेलेनियम मिळतेदुधात असलेल्या  जीवनसत्वामुळे आणि कॅल्शियममुळे 

हाडांना मजबूती येते. तसेच दातांचे आरोग्य शाबूत राहण्सास मदत होते.

साधारणपणे चाळीशीनंतर महिला ऑस्टिोपोरोसिसने ग्रस्त होतात

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या 

ऑस्टिोपोरोसिसमध्ये हाडांची झीज होते

दुधातही २९९ मिलिग्रॅम कॅल्शियम असते

रोज दूध प्यायल्याने ऑस्टिोपोरोसिस राहण्यास मदत होते

तसेच सांधे बळकट होतात. 

 

कॅल्शियम वजन संतुलित राखण्यासही मदत करते २००५ साली प्रसिध्द 

झालेल्या जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्युट्रिशनच्या अंकात डाएटरी 

कॅल्शियम वजन संतुलित राखायला आणि चरबी कमी करायला मदत करते 

असे नमूद केले आहेनिम्न रक्तदाबटाईप  मधुमेह आणि कोलनचा कर्करोग 

यारख्या रोगांना झुंज दयायला दूध पिणे गरजेचे आहे.


काय मग ? उचलताय ना ... ग्लासभर दूध ?

Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !