धैर्य आणि चिकाटीचे फळ म्हणजे चिनी बांबू वनस्पती


चिनी बांबूच्या झाडाची ही गोष्ट- सहनशिलता आणि चिकाटीचे सामर्थ्य करिते स्पष्ट.....


इतर अनेक वनस्पतींप्रमाणेचे चायनिज बांबू या वनस्पतीलाही योग्य वाढीकरिता व त्याच्या

पोषणाकरिता पाणी, सुपिक माती, आणि सुर्यप्रकाश यांचे संस्कार होणे गरजेचे असते. या सर्व

गोष्टींची सहज उपलब्धता असूनही, पहिल्या वर्षात या वनस्पतीत वाढीच्या दृष्टिने दृश्यरुपाने

विकासाचे कुठलेही स्पष्ट चिन्ह दिसत नाही.



दुसऱ्या वर्षीसुध्दा जेथे बीज रुजविले आहे, त्या भूभागावार या वनस्पतीच्या रुजल्याचे वा

वाढीचे कुठलेच संकेत मिळत नाही. पुढे तिसऱ्या आणि चवथ्या वर्षीही पहिल्या वर्षीसारखीच

परिस्थिती कायम राहून, या वनस्पतीची वाढ होत आहे याची कुठलेही चिन्ह दृश्यस्वरुपात

दिसत नाही. आता येथे आपल्या धैर्याची आणि सहनशक्तीची परिक्षाच होते (आणि आपल्याला

असे वाटू लागते की) या चमत्काराची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा की आपण या वनस्पतीला

प्रमाणांत पाणी दिले व त्याची काळजी घेतली असेल तर !! आपण आपल्यावर संशय घेवू

लागतो आणि आपल्या प्रयत्नांविषयी आपणच आपल्याला प्रश्‍न विचारु लागतो. साहजिकच मग

यातून बाहेर पडण्याचा विचार करु लागतो.



पण शेवटी, पाचव्या वर्षी काहीतरी असं अद्‌भूत घडतं.....आणि हेच चायनिज बांबूचे झाड

अंशी फुट लांब वाढलेले दिसते आणि तेही फक्त सहा आठवड्यांत...... एका क्षणाकरिता विचार

करा... खरंच हे चायनिज बांबूचे झाड हे फक्त सहा आठवड्यांत अंशी फुट वाढले असेल ?

चार वर्ष एकदम निष्क्रिय असलेली ही वनस्पती फक्त पाचव्या वर्षी एवढी वाढू शकेल ? किंवा

या छोटयाश्या वनस्पतीची रुट प्रणाली ही पहिले भूमिगत विकसित होत असेल जेणेकरुन पाच

वर्षानंतर संभाव्यरित्या भुमिच्या बाहेर वाढणाऱ्या या वनस्पतीला पूर्ण क्षमतेने आधार देऊ

शकेल?


यातून आपल्याला मिळणारे उत्तर स्पष्ट आहे. मजबूत पायाशिवाय कुठलेही झाड भूमिवर पूर्ण

क्षमतेने विकसित होऊ शकत नाही. त्याचा बाहेरून कितीही विकास झाला, परंतु त्याचा पाया

जर मजबुत नसेल, तर ही वाढ निरंतर टिकाव धरुन ठेवू शकत नाही. हेच तत्व अगदी खरे

आहे व ते सर्वच लोकांनाही लागू होते.


जे लोकं आपल्या परिश्रमाने आणि धैर्याने येणाऱ्या संकटांवर व आव्हांनावर मात करुन

आपली स्वप्नं आणि लक्ष्य गाठण्याकरिता प्रयत्न करतात आणि पूर्णत्वास नेतात, ते वाढत


जाणारे हे यश हाताळण्यासाठी अंतर्गतही तेवढेच सक्षम होत जातात. याच दरम्यान थोडक्या

कालावधीत तसेच लॉटरी जिंकल्याने श्रीमंत होणारे लोकं एकाएकी पैसा आल्यामुळे

अशाप्रकारचे यश सांभाळण्याकरिता पूर्णत: असमर्थ ठरतात.





एक शेतकरी ज्याने चायनिज बांबूचे झाड लावले होते, तो हे छोटे बी जमिनीत

रुजविल्यानंतर दरवर्षी त्याची किती वाढ झाले हे बघण्याकरिता तेथे खोदून पहात होता.

थोडक्यात वेगळया शब्दांत सांगायचे झाले तर ही क्रिया घडण्याचे कारण स्वत: केलेल्या

मेहनतीवर घेतलेला संशय ॥ पण याचा परिणाम म्हणजे तुम्ही केलेल्या मेहनतीला खरा

आकार येण्यापूर्वीच स्थगिती मिळेल व तुम्ही तुमच्या ध्येय गाठण्यापासून आणखी दोन पावले

मागे जाल.


तुम्ही आणि मी तेच करतोय. तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि प्रतिक्षा करा. पुढे

जाण्याकरिता तुमच्यावरचा(स्वत:वरचा) विश्वास पक्का ठेवा. हा विश्‍वास तुमचा आत्मविश्‍वास

दाखवितो की तुम्ही किती कठीण काम करु शकता आणि तेही कधीकधीच, अनेक वेळानंतर

की नेहमीच आणि त्यावरच तुम्हांला भविष्यांत कसे फळ मिळेल हे अवलंबुन असते. पंरतु

याकरिता आपल्याला पुढे जात रहाणे, सतत लढत रहाणे आवश्यक आहे. झिंग झिगलरने

म्हटलेच आहे की, स्वत:ला कायम उल्हसित ठेवा |!

सफलता किंवा यश हे नेहमीच आपल्या अपेक्षेपेक्षा संथगतीने मिळत असते पण तेच योग्य

आहे. यामध्ये हाच एक प्रश्‍न आहे की, तुम्ही पूर्ण क्षमतेने दिर्घकाळापर्यंत याकरिता काम

करण्याची इच्छा बाळगून आहात? तर त्यातून वाईट काही होईल असे तुम्हांस कां वाटते ?


 

Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !