Keep Your Heart Healthy

 हृदयाबद्दलची काळजी घेण्याबद्दलचे अॅप : हृदयाची निगा घेण्यामध्ये झाली क्रांती

हृदयाबद्दलची काळजी घेणारे हे अॅप म्हणजे आरोग्यक्षेत्रात एक मोठा अभिनव बदल आहे. या अॅपद्वारे प्रत्येक व्यक्तिला, ती व्यक्ती हृदयविकाराने पिडित आहे किंवा नाही एवढेच नव्हे तर हृदयाशी संबंधित कुठल्या विकाराने बाधित आहे हे सूध्दा जाणून घेता येईल. हृदयाची निगा राखणाऱ्या या अॅपमुळे या क्षेत्रात चांगली क्रांती घडून आली आहे.

सर्वसामान्य लोक हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांविषयी, त्याच्या विकारांच्या लक्षणांविषयी अनभिज्ञ असून, त्यांना या विकाराची चिन्हे ओळखता येत नाही. हृदयविकार वा त्यासंबंधित रोगाची लक्षणे सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. त्यामुळे अनपेक्षितपणे हृदयाशी संबंधित उद्भवणाऱ्या विकारांशी सामना करणे सर्वसामान्य माणसाला जड जाते. अशा परिस्थितीत या अॅपद्वारे तातडीने काही पर्यायी उपाय करणे व रुग्णाचा जीव वाचविणे हे सर्वसामान्य माणसाला काही प्रमाणात शक्य होऊ शकेल. प्रथमोपचारानंतर वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णावर उपचार करता येतात.


अशी बरीच प्रकरणे आहेत की, केवळ अज्ञानामुळे वा माहितीअभावी काही रुग्ण हे हृदयविकाराच्या लक्षणांकडेही सुरुवातीला दुर्लक्ष करतात. बराच कालावधी अशा दुखण्यावर काढल्यानंतर जेव्हा ते दुखणे सहनशक्तीच्या पलिकडे जाते, तेव्हा ते रुग्णालयात दाखल होतात. परंतु तोपर्यंत त्या रुग्णाची परिस्थिती ही अतिशय गंभीर झालेली असते आणि मग या दुखण्यातून त्याला बाहेर काढणे कठीण होऊ बसते. त्या रुग्णाला या दुखण्यातून वाचविणे मग त्या क्षेत्रातील तज्ञांनाही अशक्य वाटू लागते. या वेळ काढू धोरणामुळे हृदयाचे होणारे नुकसान हे भरुन काढण्याच्या पलिकडचे असते आणि ते पुन: पुर्वीसारखे कार्यरत होणे कठीण जाते. त्यामुळे पुढे होणाऱ्या इंद्रिय नुकसानाचे ज्ञान जर आधीच त्या रुग्णाला असेल तर त्यांची गंभीरता त्याला कळेल आणि त्याकडे दुर्लक्ष न करता, तो पहिले वैद्यकिय उपचार घेईल आणि आपल्या शरीराचे पुढे होणारे अतोनात नुकसान टाळेल.



हृदयाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता या अॅपमध्ये प्रश्नांचा एक छोटा संच दिलेला आहे आणि त्याला पर्यायही दिले आहेत. हृदयविकाराच्यादृष्टिने अपेक्षित असलेले प्रश्न जे तुम्हांला त्या परिस्थितीत हृदयरोगतज्ञ विचारेल, तेच प्रश्न या अॅपद्वारे विचारण्यात येतील. जसे की अस्वस्थ वाटणे, छातीचा त्रास, श्वास घेताना जास्त दम लागणे किंवा श्वासात अडथळा निर्माण होणे, या परिस्थितीत काही प्रश्न या अॅपद्वारे तुम्हाला विचारण्यात येतात व त्यावर पर्यायही दिलेले असतात. रुग्णाला हे पर्याय प्रामाणिकपणे निवडायचे असतात. हृदय विकाराशी संबंधित

तुम्ही निवडलेल्या पर्यायांवरुन हा अॅप एका निर्णयावर पोहचतो व त्यावरुन या आजाराची इत्थंभूत माहिती देऊन, तुम्हाला तो किती प्रमाणात आहे याचेही सविस्तर विश्लेषण करतो तसेच यापुढे या विकारामुळे येणाऱ्या धोक्यांची व त्याकरिता करण्यात येणाऱ्या उपचारांची माहितीही देतो. या अॅपमध्ये हृदयविकारांशी संबंधित अनेक वाचनीय अशी माहितीसुध्दा आहे, त्यामध्ये हृदयविकार, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपचार सांगितलेले आहेत.

एका अध्ययनानुसार तुलनात्मकदृष्टया रुग्णांच्या संबंधित करण्यात येणारे निदान हे डॉक्टरचे आणि ॲपद्वारा देण्यात येणारे निष्कर्ष बरेच मिळतेजुळते आहेत. रोजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात एखादे वेळेस व्यक्तिला स्वत:ला होणाऱ्या त्रासाबद्दल डॉक्टरांची भेट घ्यावयासही वेळ मिळत नाही त्यामुळे यासंबंधीची सखोल माहिती या अॅपमध्ये देऊन, येणारे निर्णय हे बरेचदा बरोबर असतात असे निरिक्षणाअंती दिसून आले आहे. हे अॅप वैद्यकिय क्षेत्रातील लोकांनाही आपात्कालीन काळात तसेच खूप व्यस्त जीवनशैली असलेल्या किंवा दगदगीने थकलेल्या डॉक्टरांनाही अतिशय मदतगार ठरत आहे.



परंतु या ॲपविषयी सावधगिरीचा इशारा देताना डॉक्टर म्हणतात की, हृदयाशी संबंधित हे अॅप केवळ एक मदतीचे साधन आहे. हे डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकिय निर्णयाला पर्याय होऊ शकत नाही. लोकांना शिक्षित करण्याकरिता तसेच अगदी गंभीर दुखण्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, त्याची दखल घेऊन लगेचच वैद्यकिय उपचार रुग्णांनी घ्यावेत आणि आपले व आपण प्रेम करित असलेल्या लोकांचे प्राण वाचवावे, याकरिता या अॅपचे मुख्य प्रयोजन आहे.

- संजीव पेंढरकर ई-मेल : viccolabsmumbai@gmail.com


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !