लेखांक चौथा : 'चित्ती असो द्यावे समाधान ।'
माझ्या मनावर लहानपणीची एक हिंदी कविता कायम घर करुन आहे. “लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती। कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती।।"
आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तुमचे सातत्याने प्रयत्न असले पाहिजेत. एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने सगळयांची पूर्ण होऊ शकत नाहीत. आपण प्रयत्नवादी राहिले पाहिजे. स्वकष्टाने मिळवलेला पैसा शांत झोप दोते. अनितीने मिळवलेली लक्ष्मी टिकतही नाही आणि लोभतही नाही. या सर्व विवेचनाचे कारण असे की पैसा मिळवणे हे प्रत्येकाचे उद्दिष्ट असावे पण त्याचा मार्ग 'राजमार्ग' असावा. झटपट असं आयुष्यात काहीच मिळत नसतं. परमेश्वर तुमची परीक्षा घेतो. तुमचा संयम, चिकाटी, मेहनत यात तुम्ही पासझालात की लक्ष्मी आनंदाने येते.
अर्थनीती संदर्भात आपण व्यापक विचार करायला हवा. 'मी' आणि 'माझे कुटुंब' हाच दृष्टिकोन न ठेवता त्याही पुढे जाऊन 'वसुधैव कुटुंबकम्' अशी वृत्ती वर्णिस लागली पाहिजे. व्यवसायातून अथवा नोकरीतून मिळणारा पैसा हा आपल्या स्वत:साठी, घरासाठी खर्च करावाच पण समाजऋण फेडण्यासाठी आपण काही रक्कम वेगळी ठेवायला हवी.
आपण आपल्या उदाहरणातून दुसऱ्यांसमोर 'आदर्श' निर्माण केले पाहिजेत. श्रीसमर्थांचे 'आधी केले। मग सांगितले ।।' हे वचन ध्यानात ठेवावे.
मागे विवेचन केल्याप्रमाणे अर्थप्राप्ती हे सर्वांचे उद्दिष्ट समान ठरल्यावर ते प्राप्त करण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी प्रयत्न करावेत. हा प्रयत्नांचा 'गोवर्धन' सर्वांनी आपापल्यापरीने उचलला की भगवंत त्याच्या करंगळीने तो भक्कमपणे स्थिर ठेवतो. आपण मिळवणारा पैसा समाजातून चांगल्या मार्गाने आलाप पाहिजे. वाममार्गाने नाही हे त्या घराने ठरवावे. घरात येणारी मिळकत कशी येतेय हे पाण्याचे काम घरच्या गृहिणीचे आहे. घरातील लक्ष्मीचे जतन व संवर्धन करते ती 'गृहलक्ष्मी' अशी व्याख्या आपण तयार करु.
'चित्ती असो द्यावे समाधान ।' या वृत्तीने स्त्रियांनी मिळकतीचे नियोजन करावे. गरजा मर्यादित ठेवून भविष्यकालीन परिस्थितीचे भान ठेवून स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा. पैशाच्या बाबतीत सर्वांचाच अनुभव म्हणजे 'वर ओढून घेतलं की खाली उघडं पडतंच' असा असवल्याने तो काटकसरीने वापरावा. अगदी लहान मुले आणि वृध्द मंडळी याखेरीज इतर मंडळींनी आपापल्या कुवतीनुसार अर्थार्जनासाठी प्रयत्न करावेत.
औरंगजेब फावल्या वेळात टोप्या शिवत असे काम करणाऱ्याची लक्ष्मी दासी होते.
क्रमश: