लेखांक सहावा : कष्टाचे 'बाळकडू'

स्त्रियांच्या अष्टावधानी स्वभावाने मी नेहमीच प्रभावित होतो. आर्थिक बाबतीत पुरुषांच्या बरोरीने स्त्रियाही असतील तर त्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाचीही आर्थक उन्नती होईल. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सक्षम असलेले केव्हाही बरे नाही का ? 


अनेकदा सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचा पगडा मनावर असतो. आपल्याला एका रात्रीत मोठं होता येणार नाही आपलजी वाढ हळूहळू होणार आहे. हे सर्वप्रथम लक्षात ठेवावं 'ससा आणि कारव' या गोष्टीतला कासव आपण होणार आहोत आणि 'Slow and Steady Wins the Race !' हे तत्व अवलंबवणार आहोत. 

किमान काही शिक्षण आणि जगाचा थोडाबहुत अनुभव आपल्यासाठी पुरेसा आहे. एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातील स्त्रीने केवळ घरात न बसता आपल्या क्षमतेचा उपयोग करुन आर्थिक सुधारण घडवून आणायला हवी. केवळ आर्थिक स्तर उंचावला म्हणजे आपण काही मिळवलं असं नाही तर याद्वारे आपण एक पायंडा पाडणार आहोत. 


याचे फायदे कोणकोणते होतील ? पतीला आर्थिक आधार मिळेल. महिन्याची दोन टोकं जुळविण्यात वाया जाणारे 'अनमोल क्षण' आपण आपल्याठी व्यतीत करु शकतो. शिवाय स्वावलंबनाने आणि मिळणाऱ्या पैशाने विलक्षण आत्मविश्वास वाढेल. स्वकष्टार्जित पैशाने आपल्या इच्छा पूर्ण करता येतील. कुटुंबात तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुमचा न्यूनगंड जाईल. तुम्हाला निर्णयांमध्ये सहभागी होता येईल. 


तुमच्या गृहउद्योगाकडे पती आणि मुलांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईलच शिवाय अशाप्रकारचं वातावरण असेल तर त्यसांचं उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल. मुलांवर सुसंस्कार आपोआप होतील. उगाचच पैसे उडवणं, बाहेर भटकणं, पाटर्या करणं, व्यसनाधीन होणं अशा प्रकारांना आळार बरेल कारण आईवडील कष्ट करताना त्यांच्या संवेदना हया सर्व बाबींची नोंद घेतात . 



कष्टाचे 'बाळकडू' मुलांना मिळाले की त्या 'अर्थ'प्राप्तीला खरोखरीचा 'अर्थ' प्राप्त होईल. Easy Moneyच्या मागे लागून उपयोग नाही हा संदेश त्यांच्या अबोध मनावर होईल आणि विचारांची अशी बैठक मुलांच्या यशस्वी आयुष्याचा पाया असेल मुलांच्या भवितव्यासाठी किती पैसे राखून ठेवता यापेक्षा त्यांना कसे घडवता हे फार महत्वाचे आहे. आर्थिक व्यवहाराची जाणीव मुलांना झाली की ते ही भ्रमात राहणार नाहीत. 

क्रमश: