लेखांक आठवा : सुंदर माझ्या घरा'चे स्वप्न

मध्यंतरी एका लग्नाला गेलो होतो. मंगलाष्टकातला 'सावधान' हा शब्द कानात सारखा घुमत राहिला. केवळ वधूवरांनीच नव्हे तर सर्वांनीच अखंड सावधान राहायला हवे. साडी घेतानासुध्दा स्त्री दहा दुकानात फिरते. मग आर्थिक बाबतीत कोणा एकाच्या सांगण्यावरुन आपण गुंतवणुक करतो. प्रलोभनात अडकतो आणि फसतो. जाहिरातींना भुलो, सत्यासत्यता पाहत नाही. असा पडताळा न घेतल्यानेहोणाऱ्या फसवणुकीला मग जबाबदार कोण ? 



थोडक्यात आपण सर्वांनी दक्षतेने कोणतीही गोष्ट करायला हवी. Precaution is better than Cure ! मिळकतीच्या बाबतीत तर जास्त दक्ष रहावे लागते. कारण पैसे येण्याचा मार्गएकच असतो पणखर्चासाठी वाटा हजार असतात. हा प्रत्येकाचा अनुभव. बऱ्याचदा एखाद्या स्वप्नासाठी आपण काही भाग बाजूला काढतो ण अशी काही परिस्थिती निर्माण होत की ती रक्कम तिकडे वळवावी लागते. त्यामुळे अशा गोष्टी कायम घडणारच याची मनाची तयारी असायला हवी. कारण आयुष्य सरळसोपं नाही. 

स्तांचा, विचारवंतांचा माझ्यावर फार पगडा आहे, कारण जीवनाचा अर्थ त्यांना कळलाय प्रपंचात राहूनही अनेकांनी खऱ्या अर्थाने जीवन सार्थ केलंय एक आदर्श निर्माण केलाय. आजकाल जगण्याचे संदर्भ बदललेत. कालाय तस्मै नमः। म्हणायचे आणि पुढे जायचे. 



आदि मानवापासून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचा शोध प्रयत्नचालूच आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत ते तसेच राहतील. राहणीमानात, जीवनमान उंचावलंय तसं जुन्या परिमाणांमध्ये बदल घडून येऊ पाहतात . समाज ते स्वीकारतोय . धान्य, वस्तुंच्या देवाणघेवाणीत होणारा व्यवहार आता रोख रक्कम आदिंनी होतोय . परंतु 'बचत' ही संकल्पना फार पूर्वीपासून होती, आहे आणि राहील. याबाबत पुन्हा 'श्रेय' स्त्रीकडे जाते. 'जिच्या हाती पाळण्याची दोती। ती जगाते उद्धारी।' सर्व सूत्र स्त्री समर्थपणाने सांभाळते आणिप घराला घरपण देते. म्हणून चार दिवस आई घरात नसेल तर त्या घराीच अगदी दुरावस्था होते पती पत्नीने आर्थिक बाजू पारदर्शकतेने सांभाळल्या तर अनेक घरांची घरघर संपेल आणि विश्वास व प्रेम यांचा पाया असणारे तुमचे घर तुम्हाला मायेची ऊब देईल. अशा 'सुंदर माझ्या घरा'चे स्वप्न प्रत्येकाचेच हवे. 

क्रमश: 


Popular posts from this blog

Beware, your Vicco Turmeric Cream may not be original !