लेखांक एकोणीसावा : भविष्यकाळातील गरज भागवता यावी यासाठी लोक सोने खरेदी करुन ठेवतात.


विकसनशील देशात सोन्याबद्दल विविध मतमतांतरे आढळतात . सोने खरेदी ही बहुतांश त्या देशातील नागरिकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. सोने बाळगण्याच्या बाबतीत लोकांची मानसिकता कशी असते की सामान्य माणसाला अडचणीच्यावेळी पैसा उभा करण्याचा मार्ग म्हणजे घरातील सोने ! ही अडचण म्हणजे घरातील मोठं आजारपण, उच्च शिक्षण, कर्जाची परतफेड, उसनवार, धार्मिक कार्य.. अनेक कारणं आहेत, ज्याला पैसा लागतो आणि गरजेला वेळेवर पैसा मिळत नाही. जवळचे सोने विकून पैसा उभारणे हाच एकमेव मार्ग थोडक्यात भविष्यकाळातील 

गरज भागवता यावी यासाठी लोक सोने खरेदी करुन ठेवतात. 





शेवटी काय - जीवनाच्या समरप्रसंगात वाईट अनुभवांनी व्यक्ती पोळलेली असते. अडचणीला सगळे पाठ फिरवतात. संकटातून तर तरुन जायचं असतं मग काय, एकतर सगळा हवाला देवावर आणि हक्काच्या सोन्यावर वेळ आली की माणसाला परिस्थिती काय काय करायला लावेल ते काही सांगता येत नाही. कारण कोणतंही असो, 'सोनं' ही त्या कुटुंबाची आर्थिक स्तर दर्शवणारी 

आपतकालीन स्थितीत दिलासा देणारी एकमेव वस्तू आहे, यात काही शंका नाही. 

आपण ज्या काळात वावरतोय तो काळ माहिती तंत्रज्ञानामुळे स्थित्यंतराचा झालाय आपणही मागे राहून चालणार नाही. जगात काय चाललंय याविषयी आपण माहिती घ्यायलाच हवी सोन्यासंदर्भात जागतिक बाजारपेठ, आपल्या देशाचे धोरण याविषयी किमान माहिती असायलाच हवी. बॅका, पतपेढया, पोस्ट यांच्याकडे तारण म्हणून सोनं ठेवल्यास, ठेव स्वरुपात ठेवल्यास काय घडू शकेल याचा एक किमान अंदाज असायला हवा. जो सतर्क राहतो तोच कठीण समयातून सहीसलामत बाहेर पडतो. भोळसट, निष्पाप लोकांसाठीचे सत्ययुग केव्हाच संपले, आता आलेय कलीचे राज्य ! 'बळी तो कान पिळी' हे तत्व लक्षात ठेवावे. आपल्याला कुणाला फसवून लुबाडून पुढे जायचे नाही हे मनाशी ठाम असले तरी आपण कुणाकडून फसवले वा लुबाडले जायचे नाही हे ही महत्वाचे नाही का ? 



"मुझे अपनोंनेही लूट लिया, गैरों में कहाँ दम था ? मेरी कश्ती थी डुबी जहाँ पानी कम था..." 

असे म्हणून हळहळायची वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाही. कारण पैसा, सोनं म्हटलं की नराचा नारायण न होता वानर होतो.... 

...क्रमश: