Posts

लेखांक २१ : बँकांमार्फत देशाच्या अर्थविकासात होते

Image
बँकांमध्ये असणाऱ्या रकमांवर अनेक विधायक कार्ये करण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. शरीरात रक्तवाहिन्यांचे जे कार्य आहे, थोडक्यात तेच कार्य बँकांमार्फत देशाच्या अर्थविकासात होते. या विविध कार्यामुळेच कोणत्याही देशातील बँकेची शाखा ही अतिशय महत्वपूर्ण ठरते.  आपण सगळेजण 'बँक' हा शब्द वापरतो. त्याची उत्पत्तीही गंमतीशीर आहे. अर्थनीतीमध्ये आपण पैशासंदर्भात 'बँक' ही संकल्पना पाहत असलो तरी जगभर बँक ही संकल्पना व्यापक ठरते, जसे ‘मिल्क बँक', 'स्पर्म बँक' 'बँक' इंग्रजी शब्द Banko 'बँको' या इटालियन शब्दापासून उत्पन्न झालाय. Banko या शब्दाचा अर्थ 'बसण्याचा बाक'. इटलीमध्ये पूर्वी लोंबार्डी शहरात 'ज्यू' लोक रस्त्यावरील बाकांवर बसून पैसे कर्जाऊ देत असत. नाणी / नोटा / चलनांची अदलाबदल करुन देत. आपल्या बँकांमध्येही ही कार्ये होतातच. Banko या शब्दावरुन बँक हा शब्द अस्तित्वात आला.  व्यवसाय म्हटला की चढ-उतार आलाच ! कारण कोणतेही का असेना मनुष्य संपर्कात अतिविश्वासाने, आतताईपणाने किंवा काही तंत्र न पाळल्यास कुणावरही दिवाळखोरी येऊ शकते. जगभरात प्रत्येकाला ह...

Sanjeev Pendharkar felicitates businessmen as ‘Maharashtra Gaurav’ at Diwali Business Conclave By Arthsanket 2022

Image
 

लेखांक २० : चांगल्या गोष्टींचे लाभ घ्यायचे बाजूला राहतात

Image
  गल्लीबोळात ब्युटीपार्लर्स आढळतात तशीच अवस्था जवळजवळ बॅकांच्याबाबतीत आढळते सरकारने बँकांचा प्रसार देशात सर्वत्र केलेला आहे. व्यक्तीजवळील रोकड ही घरात ठेवणे सुरक्षित नसल्याने ती बँकेत ठेवल्यास त्यावर व्याज मिळते आणि सुरक्षितता हा दुहेरी फायदा होतो. बॅका अशा स्वरुपाच्या रक्कमांवर कर्ज देऊन देशाच्या विकास कार्याला हातभार लावू शकतात. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया ही भारतातील मध्यवर्ती बॅक आहे. रिझर्व्ह बँक काही धोरणं ठरवते आणि त्यानुसार देशातील सर्व बँका त्यांची व्यवहारशैली ठेवतात.  बॅकेशी बहुतांश लोकांचा संबंध येतोच येतो. विहीत नमुन्यातील प्रवेशिका भरल्यास योग्य त्या अटी पूर्ण केल्या की कोणतीही व्यक्ती बॅकेची खातेदार होऊ शकते. प्रत्येक राज्यात 'त्रिसुत्री भाषा' असल्याने बॅकेचे विविध फॉर्मस्, पेपर्स इंग्रजी, हिंदी आणि त्याचबरोबर प्रादेशिक भाषा यांनी युक्त असतात तशी शासनाची सक्ती आहे. त्यामुळे बॅका म्हणजे काहीतरी वेगळं मनात धडकी भरवणारं प्रकरण अशी समजूत अशिक्षित, अल्पशिक्षित व्यक्तींची होऊ शकते. आपल्या डोक्यात उगाचच खुळखुळा वाजत राहतो आणि चांगल्या गोष्टींचे लाभ घ्यायचे बाजूला राहतात आणि ...

लेखांक एकोणीसावा : भविष्यकाळातील गरज भागवता यावी यासाठी लोक सोने खरेदी करुन ठेवतात.

Image
विकसनशील देशात सोन्याबद्दल विविध मतमतांतरे आढळतात . सोने खरेदी ही बहुतांश त्या देशातील नागरिकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. सोने बाळगण्याच्या बाबतीत लोकांची मानसिकता कशी असते की सामान्य माणसाला अडचणीच्यावेळी पैसा उभा करण्याचा मार्ग म्हणजे घरातील सोने ! ही अडचण म्हणजे घरातील मोठं आजारपण, उच्च शिक्षण, कर्जाची परतफेड, उसनवार, धार्मिक कार्य.. अनेक कारणं आहेत, ज्याला पैसा लागतो आणि गरजेला वेळेवर पैसा मिळत नाही. जवळचे सोने विकून पैसा उभारणे हाच एकमेव मार्ग थोडक्यात भविष्यकाळातील  गरज भागवता यावी यासाठी लोक सोने खरेदी करुन ठेवतात.  शेवटी काय - जीवनाच्या समरप्रसंगात वाईट अनुभवांनी व्यक्ती पोळलेली असते. अडचणीला सगळे पाठ फिरवतात. संकटातून तर तरुन जायचं असतं मग काय, एकतर सगळा हवाला देवावर आणि हक्काच्या सोन्यावर वेळ आली की माणसाला परिस्थिती काय काय करायला लावेल ते काही सांगता येत नाही. कारण कोणतंही असो, 'सोनं' ही त्या कुटुंबाची आर्थिक स्तर दर्शवणारी  आपतकालीन स्थितीत दिलासा देणारी एकमेव वस्तू आहे, यात काही शंका नाही.  आपण ज्या काळात वावरतोय तो काळ माहिती तंत्रज्ञानामुळे स्थित्य...

लेखांक अठरावा : सोन्याची सुरक्षितता ही देखील तितकीच महत्वाची आहे

Image
वर्तमानपत्रातील बातम्या वाचल्या की मनात चलबिचल निर्माण होते . सोन्याचे भाव गगनाला भिडले तसे सोने चोरण्याचे प्रकारही वाढले सर्वसाधारणपणे स्त्रियांना सोन्याचा सोस फार असतो असे गंमतीने म्हणतात शिवाय विविध दागिन्यांच्या स्वरुपात त्या ते वापरतातही. पुरुषांच्या बाबतीत हौसेने दागिने वापरणारे फार थोडे असावेत चेन, अंगठी आणि सणावारी ब्रेसलेट यापुढे पुरुषवर्गात फारसे अलंकार नाहीत.  पौराणिक कथेत, राजे महाराजे जसे दागिने वापरत तसे आजच्या काळात ते अशक्य आणि तितकेच असुरक्षित ! अगदी लहान मुलांना दागिने घालून 'रिस्क' वाढवू नये इथे प्रत्येकाचेच आयुष्य या ना त्या कारणाने असुरक्षित आहे, तशातच सोने वापरामुळे त्यातील धोका वाढविण्यात काही अर्थ नाही.  आपल्याकडे काही समाजात स्त्रिया इतके दागिने दैनंदिन वापरतात की कदाचित लग्नकार्य, सणसमारंभात इतर स्त्रिया ते वापरत नसतील ! सोनं ही त्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा आणि आर्थिक स्तर दर्शवित असावी अथवा हा मासिकतेचा परिणाम असू शकेल.  चोरी, दरोडा, खून यांच्या मालिका पाहिल्या तर चोरांनी नियोजनपूर्वक सावधतेने पाळत ठेवून लूट केल्याचे जाणवते. पूर्वी सोनं जमि...

लेखांक सतरावा : सोन्याचे भाव कमी जास्त होत असतातच !

Image
आपण 'विकसनशील देश' या प्रकारात मोडतो. सोनं खरेदी अथवा विक्री याचा परिणाम जसा त्या व्यक्ती - कुटुंबावर होतो, तसाच त्या त्या राष्ट्रावरही होत असतो. सोन्याबाबत निरनिराळे मतप्रवाह आहेत, तरीदेखील ‘सोनं' ही प्रतिकूल परिस्थितीत व्यक्तीला तारणारी अनमोल ठेव आहे हे मान्य करायला हवं.  लेखमालेत सुरुवातीला मी काही प्रश्नावली तयार करायला सांगितली होती. आपल्या स्थावर-जंगम इस्टेटीत आपल्याकडचे सोने किती आहे आणि असायला हवे याचा एक ताळेबंद असायला हवा. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवून आपली मासिक शिल्लक किती राहते ? त्याचा विनियोग आपण कसा करतो हे जसे महत्वाचे आहे तसेच सोने खरेदी बाबत आपले धोरण काय आहे ? शेअर्समध्ये झटपट पैसे मिळतात म्हणून सगळी गुंतवणुक तिथे ओतून उपयोगाचे नाही. नोकरीतून मिळणारा पैसा हा कायम असतो अशा वेळेस तुम्ही सुरुवातीला जबाबदाऱ्या कमी असतात म्हणून वर्षातला एक महिन्याचा पगार अथवा एक तोळा सोनं खरेदी केलंत तर सुरुवातीला मिलिग्रॅमने सुरुवात केलेलं सोनं साठवून कित्येक तोळं होईल. ... सोन्याचे भाव कमी जास्त होत असतातच !  सद्य: स्थितीत महागाई बघता सोनं किती स्वस्त होईल हे काही सांगू शक...

लेखांक सोळावा ‘मनानं श्रीमंत'

Image
मध्यंतरी पुण्यातला ‘मनानं श्रीमंत' भंगारवाल्याची कथा वर्तमानपत्रात वाचली. दिड किलो सोनं भंगार कपाटात सापडल्यावरही ते मूळ मालकाला परत करण्याचा प्रामाणिकपणा मनाला भावला. पेंडसे आजींचं ते अज्ञात सोनं भंगारवाल्याच्या बकाल आयुष्याचं सोनं करुन गेलं असतं. सद्य:काळात तो तसा वागला असता तर ते काही चूक नव्हतं. पण त्याची ही कृती मात्र २४ कॅरेट सोन्यासारखी होती. ..  लहानपणी आम्हाला 'मिडास' राजाची गोष्ट सांगायचे. मिडास राजा ज्या ज्या वस्तूला स्पर्श करायचा ती सोन्याची व्हायची. त्याला मिळालेले 'वरदान' हेवा वाटण्यासारखं होतं. कनक, कांचन, सुवर्ण किती नावं या धातूला आहेत. अगदी ‘कांचनमृग' पाहून सीतेलाही मोह आवरला नव्हता. सोन्याचं आकर्षण संपूर्ण जगभरात असलं तरी अंमळ आपल्याकडे अधिकच आहे. स्त्रिया अणि सोनं यांचही भावनिक नातं असतं. सोन्याच्या आर्थिक मूल्याबरोबरच आपण भावनिक दृष्टीने अधिक पाहतो. नातेसंबंध निकट करणारा, स्त्रियांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण दुवा आहे. आजीची बोरमाळ, सासूचे पाटल्या-तोडे, मावशीचा चपलाहार, आईच्या बांगडया, नेकलेस . . . अशा कितीतरी प्रकाराने 'त्या' वस्तूंश...

Happy Ganesh Chaturthi

Image
 

लेखांक पंधरावा : मी काही फार मोठा नाही

Image
मी कुटुंबवत्सल, समाजप्रिय मनुष्य आहे. आत्मिक विकासाकडे माझा आधीपासून कल आहे. सुदैवाने सधन कुटुंबात जन्म झाला तरी समाजव्यवस्थेतील बदल मी डोळसपणे अनुभवलेत. दारिद्रयाची, गरीबीची झळ पोहचली नसली तरी ते जीवन कष्टप्रद कसे असते याची जाणीव मला होती, आहे व राहील ! मला छानशौकीचे, दिखाऊपणाचे, श्रीमंतीचे जात्याच आकर्षण कमी आहे. मला जे विनासायास मिळालंय ते इतरांनाही मिळावं अशी माझी इच्छा असते. आमच्या विको उद्योगसमूहाने व वैयक्तिकरित्या यथाशक्ती देण्याचा मीसुध्दा प्रामाणिक प्रयत्न केलाय, करतो आणि करत राहीन.            ८४ लक्ष योनीतून मिळालेला हा 'नरदेह' मला स्वत:च्या विकासाबरोबरच इतरांच्या विकासासाठी वेचायचा आहे. सुदैवाने आध्यात्मिक विचारांचा पगडा व तशी वृत्ती असल्याने माझी गाडी कायम योग्य ट्रॅकवर राहीली कुठे घसरली नाही. 'जे जे भेटे भूत। तया मानिजे भगवंत।।' या वृत्तीने मी समाजाच्या भल्यासाठी कटिबध्द आहे. सद्हेतूने धडपड करणाऱ्या व्यक्तीला मी कधीही मदत करतो. माझा विश्वास संपादन करणाऱ्या व्यक्तीला मी कधीच निराश करत नाही. प्रामाणिक, कामसू, स्पष्ट आचार विचारांची व्यक्ती म...

लेखांक चौदावा : “लगे रहो मुन्नाभाई”

Image
लेखांक चौदावा  “लगे रहो मुन्नाभाई” सारखी 'गांधीगिरी' करायची वेळ आली आहे. अन्न वाया घालवणे, पाणी समस्या भीषण असताना त्याचा अपव्यय करणे. दूरदर्शनच्या जाहिराती आपण पाहतो पण चॅनेल बदलले की विसरतो. आपल्याला धन कमवायचे आहे तर ते वाचवायला शिकले पाहिजे. शासनाच्या अनेक जाहिराती प्रबोधनपर आहेत. वीजेचं बील किती येतं ? एसीमध्ये बसून गार हवा जितकी सुखावते तितकी बिलाची रक्कम पाहून त्या एसीतच घाम फुटतो. मग विचार करतो ? अरेच्च्या एवढे बील कसे काय ???  एका जाहिरातीत एका कुटुंबप्रमुखाच्या हातात वीज बील आल्यावर डोळयापुढे काजवे येतात. मनात असंख्य प्रश्न घेऊन तो त्या प्रशस्त घरात फिरतो. गरज नसताना ठिकठिकाणी वीज वाया जात असते. टीव्ही चालू ठेवून मुलगी बेडवर पडून फोनवर गप्पा मारत अखते. फ्रीजचं दार उघडं परंतु बायकोचं लक्ष नाही. भर दिवसा घरातले फॅन, लाईटस् चालूच असतात... त्यानंतर तो करंट लागावा तसा शोधमोहिम सुरु करुन 'स्वीच ऑफ' करत सुटतो. मग कुटुंब सदस्यही आठवणीने तो कित्ता गिरवतात आणि बीलात सुधारणा होते. कुटुंबाच्या मिळकतीचा फार मोठा हिस्सा त्यामुळे वाचतो. असे अनेक मार्ग आहेत ज्यामुळे अनाठायी ख...

लेखांक तेरावा : 'छडी लागे छमछम'

Image
घराचं अंदाजपत्रक बनवताना, हातातोंडाशी आलेला घास जाताना पाहून मला सापशिडीच्या त्या खेळाची सदैव आठवण येते. सरळ मार्गाने जाताना इतके अडथळे, इतर खेळगडी शिडयांच्या सहाय्याने झपाझप वर जात असतात. ते आणखी डिप्रेशन देणारं... अशावेळी एखादा कर्मधर्म संयोगानं सुटला तर आपण हळहळतो. भर गर्दीत आपल्याबरोबरीचा ट्रेनमध्ये चढतो आणि पुढे जातो, आपण किती सुटल्या याची गणितं मांडत बसतो.  या सर्वांतून सगळेजण जात असतात. आपल्यापेक्षा दुसरा सुखी असं प्रत्येकाला वाटतं. मनुष्यप्रवृत्ती आहे ही ! मध्यंतरी TV वर 'सोच बदलो' असं सांगणारी एक जाहिरात यायची. खरंच self talk बदलला तर किती सकारात्मक बदल घडून येतील. त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वाबर, कुटुंबावर नातेसंबंधावर किती सुंदर परिणाम होईल.  पूर्वी टीव्हीवर म्हणजे दूरदर्शनवर 'संस्कार' नावाची एक साप्ताहिक मालिका होती. त्याचे श्रीधर फडके यांच्या आवाजातले संस्कारावरचे गाणे आजही मला ताल धरायला लावते. मुंबईतल्या एका 'कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नाही' असे वातावरण असलेल्या शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून मोहन जोशी येतात.  'छडी लागे छमछम' असा ठाम विश...

लेखांक बारावा : “गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा”

Image
“गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा”. . . जुन्या काळातील हे गाणं ऐकून कातरवेळी अस्वस्थ व्हायला होतं. जीवनात वेळेला फार महत्व आहे, म्हणून इंग्रजीत 'Time is money' असं म्हटलं जातं. लोकसंख्येच्या भूभागाच्या दृष्टीने आपण अग्रेसर आहोत. नैसर्गिक विविधता आहे. लोकांमध्येही वैविध्य आहे. जगात अशी रंगांची सरमिसळ असलेला तरीही संस्कृती टिकवून ठेवणारा दुसरा देश नाही. परंतु वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की अजूनही म्हणावा तितका विकास, समृध्दी दिसत नाही. पूर्वी म्हणे 'सोन्याचा धूर' निघायचा तो काळ वेगळा होता. वास्तवात आपल्या सगळयांभोवती धूर आणि धुकं भारुन  राहिलंय....  बौध्दयांक चांगला आहे. कर्तृत्ववान माणसं आहेत. तरीदेखील दारिद्रयरेषेखालील जनता पाहिली की मन सैरभैर होतं. कोकणात पाऊस झोडपून काढतो, नद्या तुडुंब वाहतात, नियोजनाअभावी पाणी समुद्राला मिळते आणि कोकणचा कॅलिफोर्निया' होण्याचं स्वप्न 'माकडाच्या घरा' सारखं अधुरं राहतं.  आर्थिक नियोजन करताना फार बारकाईने विचार करावा लागतो. कोणत्याही देशाच्या भौतिक गरजा अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण त्यानंतर अध्यात्मिक विकासाकडे वाटचाल व्हायला हवी....

लेखांक अकरावा : “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना”

Image
एका हिंदी गाण्याची ओळ मला आठवली “बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना” प्रेयसीचा आशावाद छान आहे पण त्यापलीकडे जाऊन मला वाटतं की अशा कल्पनेत स्वप्नरंजनात गुंतुन राहण्यापेक्षा “रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा" हे जास्त समर्पक ठरावे. बदल अपरिहार्य आहे म्हणून सर्व प्रसंगातून जाऊन 'मी' जरा वेगळा ठरेन, मी लवचिक होईन.  जीवशास्त्रात 'अमिबा' जसा आकार बदलतो तसं आपण 'मोल्ड' व्हायचं. सरडयासारखं रंग बदलणं मला अपेक्षित नाही . आमच्या विको उद्योगसमूहाला ६५ वर्ष झालीत . आजोबांपासून आम्ही आयुर्वेदिक औषधांचाच पाठपुरावा केला. उत्पादनांची गुणवत्ता तशीच ठेवली. ग्राहकवर्गाच्या गरजांनुसार फेरबदल केले पण निष्ठा, सचोटी सोडली नाही. म्हणूनच आजवरच्या प्रवासात लक्ष्मी सरस्वती' सोबत राहिल्या. घामाचा एक सुगंध असतो. मी १९८६ पासून संचालकपदी आलो पण आमची परिस्थिती 'आगे दुकान पिछे मकान' अशा स्वरुपाची होती.  फॅक्टरी पण तिथेच घर पण तिथेच त्यामुळे कष्टाची सवय होती. सर्वच काम करायचे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की 'घामाचा वास' माझ्या नाकात डिओप्रमाणे भरुन राहिला. घरातच इतक...

लेखांक दहावा : जैसा देश वैसा भेस

Image
गीतेमध्ये भगवंताने 'स्थितप्रज्ञ' म्हणून एक संज्ञा योजिली आहे. कोणत्याही प्रसंगात ज्याचे चित्त समतोल राहते असा पुरुष अथवा स्त्री स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावी. यासाठी फार मोठी साधना लागते.  लक्ष्मीचा सहवास अत्यंत रम्य वाटतो. तिचा वियोग भल्याभल्यांना गुडघे टेकायला लावतो ही खरी 'स्वत्व परीक्षा' असते. गरीबी काय असते ? दारिद्रय म्हणजे काय ? हे अनुभवल्याशिवाय कळत नाही कारण परदुःख शीतल असते.  'दारिद्रय मरण यातुनि मरण बरे बा दरिद्रता खोटी मरणात दु:ख थोडे दारिद्रयात व्यथा असे मोठी।'  या काव्यपंक्तीत अखिल जगताचे दु:ख सामावलले आहे. कडक उन्हानंतर सावली जितकी सुखप्रद वाटते तितकंच सावली नंतरचं ऊन तितकंच तापदायक नकोसं वाटतं ही असळयता कोणालाच नको असते. पण कालचक्रात आपण सापडतोच सापडतो. मला सांगा दु:ख, त्रास, अपमान कोणाला हवे आहेत ? एक कुंती सोडली तर सर्वांनीच भगवंताकडे सुखाची मागणी केलीय. कलीयुगात सर्व पैशाभोवती केंद्रित झाल्याने क्षणभंगुर सुख हवेहवेसे वाटते.  'जैसा देश वैसा भेस' असे मानणारा मी आहे.  एकदा आपल्या स्वानुभवावरुन आणि इतरांच्या अनुभवावरुन जगरहाटी समजली की आपणही क...

लेखांक नववा : आता तुला साध्या सरकीच्या बियांचा त्रास होतोय

Image
मला स्वत:ला प्रवासाची. वाचनाची, लोकांशी संवाद साधण्याची अत्यंत आवड आहे घराविषयी मला ममत्व असते. तरी 'घरा'बाहेर काय चाललंय, हे जाणून घ्यायला मी अत्यंत उत्सुक असतो. माझ्या घरटयाबाहेर आज होणारं वादळ उद्या माझ्या दरवाज्यावर 'दत्त' म्हणून उभं ठाकणारच आहे . बाहय बदलांकडे मी अलिप्तपणे पाहतो आणि अत्यंत सकरात्मकतेने स्वीकारतो. माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात मी चढ-उतार पाहिले, टक्के टोणपे खाल्ले आणि या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडलो. प्रत्येकाला या प्रक्रियेतून जावेच लागते. आपल्या आयुष्याचे ५ किंवा १० वर्षांचे टप्पे केले आणि सिंहावलोकन केले तर आपलं 'मूल्यांकन' आपणच करु शकतो.  मध्यंतरी वाचनात आलेली शाहू महाराजांच्या बाबतीतली एक कथा आठवते. शाहू महाराज एकदा उन्हाळयात भर दुपारी फिरायला बाहेर पडले. त्यांची घोडागाडी माळावर पोहोचली. तेथे एक धनगर रखरखत्या उन्हातही उशाखाली धोंडा घेऊन निवांत झोपला होतो. महाराजांना त्याची दया आली. त्यांनी त्याला उठवलं. आपल्या घोडागाडीत घेतलं. राजवाडयावर आणलं. पाहुणचारासाठी ८ दिवस थांबण्याविषयी सांगितलं. त्याला सजवलेली छान खोली दिली. जेवायला सुग्रा...

लेखांक आठवा : सुंदर माझ्या घरा'चे स्वप्न

Image
मध्यंतरी एका लग्नाला गेलो होतो. मंगलाष्टकातला 'सावधान' हा शब्द कानात सारखा घुमत राहिला. केवळ वधूवरांनीच नव्हे तर सर्वांनीच अखंड सावधान राहायला हवे. साडी घेतानासुध्दा स्त्री दहा दुकानात फिरते. मग आर्थिक बाबतीत कोणा एकाच्या सांगण्यावरुन आपण गुंतवणुक करतो. प्रलोभनात अडकतो आणि फसतो. जाहिरातींना भुलो, सत्यासत्यता पाहत नाही. असा पडताळा न घेतल्यानेहोणाऱ्या फसवणुकीला मग जबाबदार कोण ?  थोडक्यात आपण सर्वांनी दक्षतेने कोणतीही गोष्ट करायला हवी. Precaution is better than Cure ! मिळकतीच्या बाबतीत तर जास्त दक्ष रहावे लागते. कारण पैसे येण्याचा मार्गएकच असतो पणखर्चासाठी वाटा हजार असतात. हा प्रत्येकाचा अनुभव. बऱ्याचदा एखाद्या स्वप्नासाठी आपण काही भाग बाजूला काढतो ण अशी काही परिस्थिती निर्माण होत की ती रक्कम तिकडे वळवावी लागते. त्यामुळे अशा गोष्टी कायम घडणारच याची मनाची तयारी असायला हवी. कारण आयुष्य सरळसोपं नाही.  स्तांचा, विचारवंतांचा माझ्यावर फार पगडा आहे, कारण जीवनाचा अर्थ त्यांना कळलाय प्रपंचात राहूनही अनेकांनी खऱ्या अर्थाने जीवन सार्थ केलंय एक आदर्श निर्माण केलाय. आजकाल जगण्याचे संदर्भ बदलल...

लेखांक सातवा : आवश्यकता आहे ती तुमच्या सजगतेची !

Image
एक स्त्री शिक्षित झाली की पूर्ण कुटुंब शिक्षित होते, असे महात्मा फुले म्हणायचे. पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर जाऊन स्त्रीने आर्थिक बाबींचा विचार करायला हवा. कारण स्त्री ही घराचा आधारस्तंभ असते महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिचे मत आवश्यक आहे. मुलांवर संस्कारांची जबाबदारी तिची असते. निसर्गानेही स्त्रीलाच काही गुण बहाल करुन संगोपनाची जबाबदारी तिच्यावर टाकली आहे . वेदकाळात स्त्रिया सक्षम होत्या. त्या स्वउन्नत्तीकरिता धडपड करायच्या, त्याला समाजमान्यता होती.  देशाचा मधला काळ सामाजिक परिस्थितीने गढूळ झाला आणि सर्वप्रथम बंधने आली ती स्त्रियांवर ! परंतु आता तिला 'या' स्वातंत्र्यासाठी झगडावे लागत नाही. प्रत्येक देश, काल, परिस्थिती भिन्न असते आणि त्यानुसार प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. अगदी रामानेही वनवास भोगला तिथे आपण कोण ?  आपल्याला आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हायचे आहे. देशाची परिस्थिती पाहता काहीतरी 'जादू' होईल आणि सर्व आलबेल होईल या भ्रमात कोणीही राहू नये.  आपण आपला विकास करताना आपोआप देशाच्या विकासास हातभार लावू शकतो. हा 'रामसेतू' आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला की ...

लेखांक सहावा : कष्टाचे 'बाळकडू'

Image
स्त्रियांच्या अष्टावधानी स्वभावाने मी नेहमीच प्रभावित होतो. आर्थिक बाबतीत पुरुषांच्या बरोरीने स्त्रियाही असतील तर त्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाचीही आर्थक उन्नती होईल. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सक्षम असलेले केव्हाही बरे नाही का ?  अनेकदा सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचा पगडा मनावर असतो. आपल्याला एका रात्रीत मोठं होता येणार नाही आपलजी वाढ हळूहळू होणार आहे. हे सर्वप्रथम लक्षात ठेवावं 'ससा आणि कारव' या गोष्टीतला कासव आपण होणार आहोत आणि 'Slow and Steady Wins the Race !' हे तत्व अवलंबवणार आहोत.  किमान काही शिक्षण आणि जगाचा थोडाबहुत अनुभव आपल्यासाठी पुरेसा आहे. एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातील स्त्रीने केवळ घरात न बसता आपल्या क्षमतेचा उपयोग करुन आर्थिक सुधारण घडवून आणायला हवी. केवळ आर्थिक स्तर उंचावला म्हणजे आपण काही मिळवलं असं नाही तर याद्वारे आपण एक पायंडा पाडणार आहोत.  याचे फायदे कोणकोणते होतील ? पतीला आर्थिक आधार मिळेल. महिन्याची दोन टोकं जुळविण्यात वाया जाणारे 'अनमोल क्षण' आपण आपल्याठी व्यतीत करु शकतो. शिवाय स्वावलंबनाने आणि मिळणाऱ्या पैशाने...

लेखांक पाचवा : 'चूल आणि मूल'

Image
पूर्वीच्या बायका म्हणत 'नवऱ्याने भाकरीचे पाठ मिळवले तर बाईने मीठ मिळवावे'. किती उदात्त विचारसरणी होती! 'चूल आणि मूल' इतपतच स्त्रिया काही करु शकत होत्या. शिक्षणाचा गंध नाही. आजच्यासारखी परिस्थिती खचितच तेव्हा नव्हती, तरीदेखील प्रपंचासाठी काही करण्याची त्यांची उर्मी फार काही सांगून जाते.  मी स्त्रीला आदिशक्तीच्या रुपात मानतो, पाहतो. मला स्त्रियांविषयी अत्यंत आदर आहे. स्त्रियांच्या, कष्टामुळे सहनशक्तीमुळे खंबीरपणाने किती आधार मिळतोहे मी स्वत: अनुभवलेले आहे. पुरुषाने कमवायचे आणि स्त्रीने त्याचे जतन करायचे यापुढे पाऊल टाकून स्त्रीनेही पुरुषाच्या बरोबरीने कमवायचे हा आजच्या काळातला समाजमान्य विचार ! याबद्दल दुमत नाही. स्त्रीच्या कर्तृत्वाला मर्यादा नाहीत म्हणूनच आर्थिक बाबतीतले तिचे स्वातंत्र्य तिच्यासाठी, तिच्या घरासाठी आणि सबंध समाजासाठी विशेष महत्वाचे ठरते.  कष्टकरी स्त्री असो वा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमधील उच्चशिक्षित उच्च पदस्थ स्त्री असो, दोघीही आर्थिक बाबतीतले नियाजन अतिशय काटेकोरपणे करतात-पाळतात.  मधमाश्यांच्या पोळयात एक 'राणी माशी' असते आणि इतर कामकरी माश्या वि...

लेखांक चौथा : 'चित्ती असो द्यावे समाधान ।'

Image
माझ्या मनावर लहानपणीची एक हिंदी कविता कायम घर करुन आहे.  “लहरोंसे डरकर नौका पार नहीं होती। कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती।।"  आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तुमचे सातत्याने प्रयत्न असले पाहिजेत. एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने सगळयांची पूर्ण होऊ शकत नाहीत. आपण प्रयत्नवादी राहिले पाहिजे. स्वकष्टाने मिळवलेला पैसा शांत झोप दोते. अनितीने मिळवलेली लक्ष्मी टिकतही नाही आणि लोभतही नाही. या सर्व विवेचनाचे कारण असे की पैसा मिळवणे हे प्रत्येकाचे उद्दिष्ट असावे पण त्याचा मार्ग 'राजमार्ग' असावा. झटपट असं आयुष्यात काहीच मिळत नसतं. परमेश्वर तुमची परीक्षा घेतो. तुमचा संयम, चिकाटी, मेहनत यात तुम्ही पासझालात की लक्ष्मी आनंदाने येते.  अर्थनीती संदर्भात आपण व्यापक विचार करायला हवा. 'मी' आणि 'माझे कुटुंब' हाच दृष्टिकोन न ठेवता त्याही पुढे जाऊन 'वसुधैव कुटुंबकम्' अशी वृत्ती वर्णिस लागली पाहिजे. व्यवसायातून अथवा नोकरीतून मिळणारा पैसा हा आपल्या स्वत:साठी, घरासाठी खर्च करावाच पण समाजऋण फेडण्यासाठी आपण काही रक्कम वेगळी ठेवायला हवी.  आपण आपल्या उदाहरणातून दुसऱ्यांसमोर ...

लेखांक तिसरा : पळसाला पाने तीनच !

Image
  आपल्या पूर्वजांनी किंवा आधीच्या पिढीने फार विचारपूर्वक काही गोष्टी म्हणींच्या रुपात आपल्याला वारसा म्हणून दिलेल्या आहेत. कालबाहय म्हणून त्या टाकून न देता कालानुरुप योग्य ते बदल करुन त्याचे सुधारित स्वरुप निश्चितच आपल्याला जीवनात आनंद निर्माण करु शकेल. पैशांची समस्या नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात 'अर्थ' समस्या भेडसावत असतेच असते. व्यक्तिंनुसार तिची तीव्रता बदलेल पण समस्या ही असणारच ! पळसाला पाने तीनच ! (मोठी असतील छोटी असतील पण पाने तीनच).  थोडक्यात धनसंपत्तीबद्दल म्हणायचं झालं तर “थोडा है थोडे की जरुरत है।” असं प्रत्येकाला वाटतंच वाटतं. किती मिळालं तरी समाधान होत नाही उलट हवंहवंसं वाटणारं हे जगातलं एकमेव 'अर्थ' शास्त्र ! या 'अर्था' ने जीवनाला कधी 'अर्थ' मिळतो तर कधी 'अनर्थ'ही होतो. आपल्याला या 'सुंदर' जगण्याला अर्थपूर्ण करायचं आहे . शून्यातून जग निर्माण करणाऱ्यांनी किंवा इतिहास घडविणाऱ्यांच्या आयुष्याकडे नजर टाकली तर अनेक समस्यांना भिडत त्यांनी आपला 'नवा' मार्ग चोखाळला की ज्याने त्यांनाही अचं...

लेखांक दूसरा : 'सबसे बड़ा रुपय्या'

Image
'सबसे बड़ा रुपय्या' म्हणणाऱ्या या युगात आपल्याला रहायचे आहे. सबंध / संपूर्ण आयुष्य पैशाभोवती फिरु लागल्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. पण लक्षात ठेवा सचोटी, श्रमाने मिळवलेले धन कायम टिकते, त्यात वृध्दी होते. लक्ष्मी चंचल असते म्हणून तिचा कायमचा वास राहण्यसाठी प्रत्येकाने तिचा आदर करायला शिकलं पाहिजे.  जोडोनि धन उत्तम वेव्हारे। उदासपणे खर्च करी।। असे तुकोबा म्हणतात, त्यामागे मर्म हेच आहे . व्यवस्थापनशास्त्राचा कोणताही अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या अडाणी व्यक्तीदेखील आपलं गृहखातं व्यवस्थित सांभाळतात. काटकसरी वृत्तीने पैसा सांभाळला तर आपोआप धनसंचय होत असतो.  आर्थिक दृष्टीकोनातून समाजातील वर्ग विचार केला तर कनिष्ठ-मध्य-उच्च वर्गांचा समावेश होत असतो. या सर्वांकडे कमी अधिक प्रमाणात पैसा असतो. आपला आर्थिक स्तर उंच असावा असे प्रत्येकाला वाटते आणि त्यात गैर काही नाही. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन योग्य असेल तर काही काळात आपण आपले ईप्सित ध्येय गाठू शकतो. आपण कोणत्या वर्गात मोडतो ? म्हणजेच आपण (पॅक्टीकल) वास्तव परिस्थिती स्...

1 लक्ष्मीचे पूजन आणि संवर्धन

Image
काडी काडी जमवून पक्षी घरटं बांधतात आणि आपला काळ सुखाने घालवतात. आपण तर मनुष्यप्राणी विकसित मेंदू लाभलेला निसर्गाचं वरदानच जणू ! त्यालाही एक सुंदर घर असतं  आणि तद्नुषंगानं 'घराची समीकरणं' सोडवण्यात प्रत्येकाचंच आयुष्य व्यतित होतं . लक्ष्मी, पैसा अर्थात 'अर्थ' याला जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. कसोटी पाहणारा, गोंधळवून टाकणारा हा पैसा असला तरी समस्या आणि नसला तर त्याहून अधिक समस्या !  अर्थप्राप्ती जशी कष्टप्रद असते त्यापेक्षा तिची योग्य गुंतवणुक जास्त कष्टप्रद ! लक्ष्मीचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो, तिला नाकारणारा एखादाच कपाळकरंटा !  मेळविती तितुके भक्षिती। ते कठिण काळी मरोन जाती।। असे श्री समर्थांनी दासबोधात म्हटलेच आहे. थोडक्यात जे काही प्राप्त कराल त्यातील अल्पस्वल्प भविष्याच्या दृष्टीने साठवून ठेवावे लागते. पावसाळयाच्या तोंडावर मुंगीसारख्या यःकश्चित प्राणीही अन्नधान्याचा साठा करतो. आपण तर काय बुध्दीचे वरदान मिळालेले निसर्गातले सर्वश्रेष्ठ !  आपण किती जगणार ? म्हणजे आर्युमर्यादा किती ? हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याच्या...

Keep Your Heart Healthy

Image
 हृदयाबद्दलची काळजी घेण्याबद्दलचे अॅप : हृदयाची निगा घेण्यामध्ये झाली क्रांती हृदयाबद्दलची काळजी घेणारे हे अॅप म्हणजे आरोग्यक्षेत्रात एक मोठा अभिनव बदल आहे. या अॅपद्वारे प्रत्येक व्यक्तिला, ती व्यक्ती हृदयविकाराने पिडित आहे किंवा नाही एवढेच नव्हे तर हृदयाशी संबंधित कुठल्या विकाराने बाधित आहे हे सूध्दा जाणून घेता येईल. हृदयाची निगा राखणाऱ्या या अॅपमुळे या क्षेत्रात चांगली क्रांती घडून आली आहे. सर्वसामान्य लोक हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांविषयी, त्याच्या विकारांच्या लक्षणांविषयी अनभिज्ञ असून, त्यांना या विकाराची चिन्हे ओळखता येत नाही. हृदयविकार वा त्यासंबंधित रोगाची लक्षणे सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. त्यामुळे अनपेक्षितपणे हृदयाशी संबंधित उद्भवणाऱ्या विकारांशी सामना करणे सर्वसामान्य माणसाला जड जाते. अशा परिस्थितीत या अॅपद्वारे तातडीने काही पर्यायी उपाय करणे व रुग्णाचा जीव वाचविणे हे सर्वसामान्य माणसाला काही प्रमाणात शक्य होऊ शकेल. प्रथमोपचारानंतर वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णावर उपचार करता येतात. अशी बरीच प्रकरणे आहेत की, केवळ अज्ञानामुळे वा माहितीअभावी काही रुग...

स्वदेशीचे युग - भ्रम आणि वास्तव

Image
निवडणुकीचे वर्ष असले की घोषणांच्या आतिषबाजीने व आश्वासनांच्या खैरातीने जनतेला खूष करुन सत्ता काबीज करण्याकरिता प्रत्येक पक्ष इमानदारीने कार्यरत होतो व प्रयत्नाला लागतो. या काळात देशात असा काही फिलगुडचा माहोल तयार केल्या जातो की या मोहमयी जादूला जनताही बळी पडली नाही तरच नवल! खरे तर फिलगुडची प्रक्रिया ही जनतेच्या मनात सुरक्षिततेची, आत्मविश्वासाची व स्वप्नपूर्तीची भावना जागविणारी असते. नव्या नव्या योजनांच्या घोषणांमुळे अनेक वर्षाच्या स्वप्नांची पूर्तता आता होणार, अशा भ्रमात जनतेचा कधी व कसा भ्रमनिरास होतो याचा उत्तम नमुना सद्यपरिस्थितीइतका दुसरा दिसणार नाही. “मेक इन इंडिया” च्या जोरकस घोषणा आणि त्यादृष्टिने सरकारचे एक एक पाऊल पुढे पडतांना पाहून अनेक स्वदेशी उद्योजकांच्या मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. “स्वदेशीला आता सोनेरी दिवस येणार!” असे वाटत असतांनाच जीएसटी मध्ये आयुर्वेदिक औषधांवर सहा टक्के लागू होणारी कर आकारणी ही एकदम बारा टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. एकतर आयुर्वेदासारख्या आपल्या पारंपारिक भारतीय शास्त्राला आजपर्यंत कोणत्याही शासनाकडून हवे तसे व कुठल्...

संस्कार || काय भुललासी वरलिया रंगा। ऊस डोंगा परि रस नाहि डोंगा ।।

Image
स्त्री सौंदर्याचा व्यापक विचार करत असताना मला संत तुकामेळा यांचा एक अभंग आठवला काय भुललासी वरलिया रंगा। ऊस डोंगा परि रस नाहि डोंगा।। ऊस वरुन पाहिला तर ओबडधोबड व खडबडीत दिसतो पण त्याचं अंतरंग गोड असल्याने रस गोडच निघतो. याच संदर्भातील बा भ बोरकरांची कविताही आठवते. देखणे चेहरे जे अंतरिचे आरसे। सावळे की गोरटे या मोल नाही फारसे ।। बाहय सौंदर्यापक्षा अंतरंग, आपलं मन या गोष्टींना जास्त महत्व आहे. आपल्या मनाची जडणघडण लहानपणापासूनच आईवडील करीत असतात. मोठा वाटा आईचाच असतो. आई आपल्या मुलींना शरीराची काळजी कशी घ्यायची याचे शिक्षण तर देतेच पण त्याचबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, आपली व इतरांची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता व टापटीप कशी ठेवायची हेही सांगत असते. शरीराबरोबरच मनाचं सौंदर्य वाढविण्याची जबाबदारीही तिचीच असते. हे संस्कार महत्वाचे असतात इथं मला एक चोर व त्याच्या आईची गोष्ट आठवते. हा मुलगा लहानपणापासून छोटया मोठया चोऱ्या करीत असे कधी पेन्सिल चोर, तर कधी खोडरबर चोर अशा गोष्टींनी त्याने सुरवात केली. मग छोटया वस्तू उचलून आणू लागला. त्याच्या आईने त्याला कधीच अडवलं नाही. मोठा झाल्यावर तो अट्टल चो...

VICCO honoured to be part of Inaugural Ceremony of Durbar Hall at Raj Bhavan Maharashtra !!

Image
  The President of India Ramnath Kovind on Friday inaugurated the newly built Darbar Hall at Raj Bhavan. In his speech, he said that transparency is the most important aspect of good governance in a democratic system. ‘’The modern concept of the Darbar promotes transparency. The method of connecting with the people through the Janta Darbar by the public authorities is becoming popular. Thus, this Darbar Hall, in a new context, is a symbol of our new India, new Maharashtra and our vibrant democracy,’’ he noted.   The Governor spoke about his achievements in the past two and a half years. He also expressed his happiness at the construction of the Darbar Hall. He said, "I always wished to change the Raj Bhavan to a place where people can come and express their problems to the government."   He further spoke about the workers who worked hard during the lockdown. He said, "In these years, many social workers have dedicated their life towards saving other lives, during the loc...